प्रथम ओपन स्कूल
प्रथम ओपन स्कूल हे विद्यार्थ्यांचे वय, त्यांची समज आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ, काही खेळ आणि इतर शैक्षणिक संसाधनांचे भंडार आहे. मुलांना आणि तरुणांना शाळा, कामकाज आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी तयार करणे हे या ओपन लर्निंग सिस्टीमचे (मुक्त शिक्षण यंत्रणा) उद्दिष्ट आहे.