EDUCATION RESOURCES FOR HOME SCHOOLING

घरातून शालेय शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक साधने

कोविड-१९ या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर केलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून सध्या जगभरातील अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे दीड अब्जांहून (1,500,000,000) अधिक मुले शाळेत उपस्थित राहू शकत नाहीत. दुर्दैवाने अधिक देशांमध्ये शाळा अनिश्चित काळ बंद ठेवाव्या लागल्यामुळे या आकडयात वाढ होणे अपेक्षित आहे.

जगभरातील मानव समाज या महामारीने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करत असतानाच दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या आगळ्या वेगळ्या समस्या, वंचित व उपेक्षित समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाच्या ठरतील. या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बऱ्याच शाळा दूरशिक्षणाच्या उपायाचा/पद्धतीचा अवलंब करत आहेत. परंतु जगातील बहुसंख्य विद्यार्थी दूरशिक्षणाच्या पायाभूत सुविधा व संबद्धता/कनेक्टिव्हिटी (connectivity), अभ्यासाशी संबंधित मान्यताप्राप्त डिजिटल (digital) मजकूर तसेच हार्डवेअर (hardware) यांपासून वंचित आहेत. डिजिटल (digital) संबद्धता असणाऱ्यांसाठी तसेच नसणाऱ्यांसाठीही तात्पुरत्या उपाययोजना तयार करणे शक्य आहे व तसे करणे जरुरीचे आहे.

या आपत्कालीन परिस्थितीत प्रारंभिक प्रतिक्रिया म्हणून इ ए ए (EAA)चे नवोन्मेष विकास संचालनालय (IDD, Innovation Development Directorate) शैक्षणिक वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी साहित्याची निर्मिती करत राहील. ही साधने स्वयंसेवी संस्था, शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहेत. यात जवळपास निम्म्या विश्वातल्या डिजिटल संबद्धता नसलेल्या कुटुंबातील विद्यार्थी तसेच शिक्षणाला पूरक अशा ऑनलाईन शाळेकडे वळलेले विद्यार्थीही आहेत. .

डिजिटल संबद्धता नसल्यामुळे अलग पडलेल्या, ज्यांच्यापर्यंत पोचणे अवघड आहे अशा समाजघटकांशी पर्यायी मार्गांनी संपर्क साधण्याच्या सर्वोत्तम पर्यायी पद्धती समजावून घेण्यासाठी तसेच त्या इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आय डी डी संशोधन करीत आहे. तुम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेशी किंवा शाळेशी संबंधित असाल तर आम्हाला innovations@eaa.org.qa या पत्त्यावर ईमेल करा किंवा linkहा दुवा वापरून ऑनलाईन अर्ज भरून पूर्ण करा..

आंतरजाल विरहित (Internet-free) शैक्षणिक साधनांची पेढी (Internet Free Educational Resource Bank)

तंत्रज्ञानाची गरज नसलेल्या , अनेक विद्याशाखांचा संयोग साधणाऱ्या (interdisciplinary), सर्व विषयांच्या आकर्षक शैक्षणिक प्रकलपांची पेढी कार्यान्वित करायची आहे. अगदी कमी साधने वापरून करण्याचे हे प्रकल्प वयोगटांनुरूप तयार करण्यात आले आहेत. आय डी डी ही यादी व पेढी सतत अद्ययावत करत राहील तसेच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नवनवीन साधने विकसित करत राहील.

या कामासाठी आंतरराष्ट्रीय परवाना प्राप्त केलेला आहे.Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.